“माझ्या मुलीने विचारलेला अस्वस्थ करणारा प्रश्न”
मकरसंक्रांतीच्या दिवशी कुटुंबासोबत तिळगुळ वाटायला नातेवाईकांकडे गेलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले प्रचंड राजकीय बॅनर पाहून माझ्या निरागस मुलीने विचारले—
“पप्पा, ही माणसं कोण आहेत? आणि त्यांनी एवढे मोठे पोस्टर का लावले आहेत?”
मी तिला सांगितले—“बाळा, निवडणुका आहेत. ही मंडळी एकमेकांविरुद्ध लढतात. जी जिंकतील, ती नगरसेवक होतील.”
ती लगेच विचारते—“मग ते शहर साफ करतील का? रस्ते चांगले करतील का? पाणी येईल का?”
माझ्या तेरा वर्षांच्या मुलाने पुढे प्रश्न टाकला—
“पप्पा, जर हे लोक सेवा करणार असतील, तर मग इतका गोंधळ, रॅल्या, ट्रॅफिक जाम, शाळेच्या मुलांना होणारा त्रास… हे सगळं कशासाठी?”
त्या एका वाक्यात आजच्या लोकशाहीचा आरसा दिसला.
Generation Z आणि Generation Alpha ही मुलं फक्त शिकत नाहीत—ती विचार करतात.
आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे “जाहिराती” देत नाहीत—जबाबदारी देतात.
खरंच, जर एखाद्याला सेवा करायचीच असेल,
तर पोस्टर, रॅली, करोडो खर्च…
या सगळ्याची गरज का?
एक साधा प्रश्न मनात येतो—
“सेवा करायची आहे की सत्तेचा मेवा खायचा आहे?”
जर सर्व उमेदवारांनी निवडणुकीत खर्च होणारा पैसा एकत्र केला,
तर एक वॉर्ड नव्हे—पूर्ण शहर स्मार्ट सिटी होऊ शकते.
मग निवडणूक ही विकासाची प्रक्रिया आहे की खर्चाची स्पर्धा?
आज मुलं विचारतात—
“निवडून आल्यावर हे लोक आपल्याला भेटतील का?
आज जितके नम्र दिसतात, उद्या तितकेच राहतील का?”
आपल्याला उत्तर माहिती आहे.
अपवाद वगळता, बरेच जण निवडणुकीनंतर वॉर्डमध्येही दिसत नाहीत.
आजची पिढी पैशाकडे, पॉवरकडे का धावते—
याचं मूळ त्यांना शिकवण्यात नाही,
तर ते काय पाहतात यामध्ये आहे.
जेव्हा मुलं पाहतात की—
-
खोटं चालतं
-
भ्रष्टाचार जिंकतो
-
गोंधळात सत्ता मिळते
तेव्हा त्यांना नैतिकतेची शिकवण कोणीही पाजू शकत नाही.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, रतन टाटा, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई—
यांनी भारताला स्वप्न दिलं चरित्राचं, फक्त यशाचं नाही.
पण आज आपण येणाऱ्या पिढीसमोर काय ठेवतो आहोत?
पोस्टर की मूल्ये?
गोंधळ की संस्कार?
देशाचा पंतप्रधान स्वतःला “प्रधान सेवक” म्हणतो.
मग गल्लीतील कार्यकर्ता स्वतःला “महान” का समजतो?
ही चढाओढ नाही—ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे.
कारण ही पिढी झाडांसारखी आहे.
आपण जर तिला
संस्कारांचं पाणी
आणि मूल्यांचं खत दिलं,
तर ती भारताला पुन्हा वैभवापर्यंत नेईल.
नाहीतर,
हीच पिढी या घाणेरड्या वातावरणाला कंटाळून देश सोडेल—
आणि आपल्याकडे उरेल फक्त रिकामेपण.
हा लेख कोणावर आरोप नाही.
हा एका शिक्षकाच्या मनातील कळकळ आहे.
जर शब्द टोचले असतील, तर माफी.
पण प्रश्न दुर्लक्षित करू नका.
कारण
मुलं प्रश्न विचारत आहेत…
आणि देश उत्तर शोधतो आहे.
Prof Mahesh Khadke.
मकर संक्रांति के दिन मैं अपने परिवार के साथ रिश्तेदारों के यहाँ तिलगुल बाँटने गया था।
रास्ते भर लगे बड़े-बड़े राजनीतिक बैनर देखकर मेरी छोटी बेटी ने मासूमियत से पूछा—
“पापा, ये लोग कौन हैं? और इन्होंने इतने बड़े पोस्टर क्यों लगाए हैं?”
मैंने कहा—“बेटा, चुनाव आने वाले हैं। ये लोग एक-दूसरे के खिलाफ लड़ते हैं। जो जीतेंगे, वे नगरसेवक बनेंगे।”
उसने तुरंत अगला सवाल दागा—
“तो क्या ये शहर साफ करेंगे? सड़कें ठीक करेंगे? पानी आएगा?”
मेरे तेरह साल के बेटे ने पूछा—
“अगर ये लोग सेवा करने वाले हैं, तो फिर इतना शोर, रैलियाँ, ट्रैफिक जाम, स्कूल जाने वाले बच्चों को परेशानी… ये सब क्यों?”
उस एक सवाल में आज की पूरी राजनीति नंगी हो गई।
आज की Generation Z और Generation Alpha सिर्फ पढ़ती नहीं—
सोचती है, सवाल करती है।
अगर सच में सेवा करनी है,
तो करोड़ों के पोस्टर, रैलियाँ और दिखावा क्यों?
एक सीधा सा सवाल उठता है—
“सेवा करनी है या सत्ता का मेवा खाना है?”
अगर सभी उम्मीदवार अपने चुनावी खर्च का पैसा एक साथ जोड़ दें,
तो एक वार्ड नहीं—पूरे शहर को स्मार्ट सिटी बनाया जा सकता है।
फिर ये चुनाव विकास के लिए है या धन-प्रदर्शन के लिए?
बच्चे आज पूछ रहे हैं—
“चुनाव के बाद भी ये लोग हमें मिलेंगे क्या?
आज जितना झुककर बोलते हैं, उतना बाद में भी करेंगे क्या?”
हम सबको जवाब पता है।
आज की पीढ़ी पैसे और ताकत की तरफ क्यों भाग रही है?
क्योंकि वह यही देख रही है कि—
-
झूठ चलता है
-
भ्रष्टाचार जीतता है
-
शोर से सत्ता मिलती है
फिर हम उनसे ईमानदारी की उम्मीद कैसे करें?
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, रतन टाटा, शिवाजी महाराज, रानी लक्ष्मीबाई—
इन लोगों ने भारत को चरित्र का सपना दिखाया था, सिर्फ सफलता का नहीं।
लेकिन हम आज अपनी नई पीढ़ी के सामने क्या रख रहे हैं?
पोस्टर या मूल्य?
प्रधानमंत्री खुद को “प्रधान सेवक” कहते हैं।
तो फिर गली का नेता खुद को “महान” क्यों समझता है?
यह लड़ाई नहीं,
यह आत्मचिंतन की घड़ी है।
क्योंकि यह पीढ़ी पौधों की तरह है।
अगर हम इसे संस्कारों का पानी और मूल्यों की खाद देंगे,
तो यही भारत को उसके वैभव तक ले जाएगी।
वरना,
यह पीढ़ी इस गंदे सिस्टम से थककर देश छोड़ देगी।
यह लेख किसी पर आरोप नहीं।
यह एक शिक्षक की पीड़ा है।
अगर शब्द चुभे हों, तो माफ़ी।
लेकिन सवाल मत टालिए।
क्योंकि
बच्चे पूछ रहे हैं…
और देश उत्तर ढूँढ रहा है।
On Makar Sankranti, while visiting relatives with my family to exchange tilgul, my little daughter noticed huge political banners everywhere and asked innocently,
“Papa, who are these people? And why are their photos so big?”
I replied, “Elections are coming. These people are contesting. Whoever wins will become a municipal councillor.”
She immediately asked,
“So will they clean the city? Fix the roads? Ensure water supply?”
My thirteen-year-old son added,
“If they want to serve, why all this noise, rallies, traffic jams, and inconvenience to school children?”
In that moment, today’s democracy stood exposed.
This generation doesn’t just study.
It questions.
If one truly wants to serve,
why the crores spent on banners, rallies, and publicity?
A simple question arises:
Is it service—or the sweetness of power?
If all candidates pooled their election expenses,
they could turn entire cities into smart cities.
So are elections about development—or display of wealth?
Children today ask:
“Will these leaders still meet us after elections?
Will they remain humble when the power comes?”
We all know the answer.
Today’s youth runs after money and power
because they see that:
-
lies work
-
corruption wins
-
noise brings authority
Then how can we expect them to believe in values?
From Dr. A.P.J. Abdul Kalam to Ratan Tata,
from Shivaji Maharaj to Rani Lakshmibai—
they dreamed of a nation built on character, not just success.
But what are we showing our next generation?
Posters—or principles?
The Prime Minister calls himself a servant of the nation.
Then why do local leaders behave like masters?
This is not a political attack.
This is a moment of collective introspection.
Because this generation is like a sapling.
If we nurture it with values and integrity,
it will take India to its greatest glory.
Otherwise, it will grow tired of this rotten system and leave.
These words are not accusations.
They are the concern of a teacher.
If they hurt, I apologise.
But don’t ignore the questions.
Because
our children are asking…
and the nation must answer.






Comments
Post a Comment