“माझ्या मुलीने विचारलेला अस्वस्थ करणारा प्रश्न”
मकरसंक्रांतीच्या दिवशी कुटुंबासोबत तिळगुळ वाटायला नातेवाईकांकडे गेलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले प्रचंड राजकीय बॅनर पाहून माझ्या निरागस मुलीने विचारले— “पप्पा, ही माणसं कोण आहेत? आणि त्यांनी एवढे मोठे पोस्टर का लावले आहेत?” मी तिला सांगितले—“बाळा, निवडणुका आहेत. ही मंडळी एकमेकांविरुद्ध लढतात. जी जिंकतील, ती नगरसेवक होतील.” ती लगेच विचारते—“मग ते शहर साफ करतील का? रस्ते चांगले करतील का? पाणी येईल का?” माझ्या तेरा वर्षांच्या मुलाने पुढे प्रश्न टाकला— “पप्पा, जर हे लोक सेवा करणार असतील, तर मग इतका गोंधळ, रॅल्या, ट्रॅफिक जाम, शाळेच्या मुलांना होणारा त्रास… हे सगळं कशासाठी?” त्या एका वाक्यात आजच्या लोकशाहीचा आरसा दिसला. Generation Z आणि Generation Alpha ही मुलं फक्त शिकत नाहीत—ती विचार करतात . आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे “जाहिराती” देत नाहीत— जबाबदारी देतात. खरंच, जर एखाद्याला सेवा करायचीच असेल, तर पोस्टर, रॅली, करोडो खर्च… या सगळ्याची गरज का? एक साधा प्रश्न मनात येतो— “सेवा करायची आहे की सत्तेचा मेवा खायचा आहे?” जर सर्व उमेदवारांनी निवडणुकीत खर्च हो...


.png)



