भाषा
संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा,तसेच तुमची भाषाच इतर व्यक्तींपर्यंत तुमची कौटुंबिक, सामाजिक ,शैक्षणिक माहिती कळत न कळत पोहचवत असते. तुमच्या बोली भाषेमध्ये किंवा लिखाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा ,कोट्यांचा ,व्याकरणाचा चांगला उपयोग होत असेल तर लगेचच हे कळून येते ही व्यक्ती सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातील आहे या व्यक्ती चे वाचन ही चांगलं आहे व त्याच्या सभोवताली असलेले लोक सुद्धा चांगल्या शैक्षणिक व सामाजिक वातावरणात ना आलेले आहेत पण तुमच्या बोली भाषेमध्ये सातत्याने शिव्या तेच तेच शब्द असतील तर तुमची कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक किती अधोगती झाली आहे हे सुद्धा कळते. तसेच आपल्या आई-वडिलांसमोर बोलताना न येणारे शब्द पण आजची पिढी सर्रास दररोजच्या बोली भाषेमध्ये येत असतील तर तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या किती चांगले आहात हे माहीत नाही पण सामाजिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या अशिक्षित आहात याचे उत्तम पुरावा असते.
प्रल्हाद केशव अत्रे पु ल देशपांडे वि सा खांडेकर व पु काळे ईत्यादी मराठीतील नामवंत लेखक व कवी यांचे लिखाण आपण वाचत असताना शब्दांचा किती सुंदर उपयोग या लेखकांनी व कवींनी केलेला आहे हे आपल्या लक्षात येतं आणि याच किंवा इत्यादी लेखकांचे लिखाण शालेय जीवनापासून मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले असते परंतु आज जर आपण पाहिलं तर कोणत्याही शाळेच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये जर आपण उभे राहिलो तर आजच्या शालेय किंवा कॉलेजमधील मुला मुलींची भाषा जर ऐकली (तर आपल्याला म्हणजे जे आपण सुशिक्षित म्हणून घेतो) अशा व्यक्तीना कोणी आपल्या कानात गरम शिशे ओतत आहे असा भास होतो आणि मग आपण स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातच आहोत का? आपणच ते आहोत का जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी,छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा सांगतोय ? संत ज्ञानेश्वर ., संत तुकाराम यांच्या ओव्यांनी आपली भाषा समृद्ध केली त्याच माय मराठीचा आम्ही वारसा सांगतो का ? हा यक्ष प्रश्न पडतो.
ही आर्वाच भाषा फक्त आजकालच्या मुलांच्या बोलण्यातच नाही तर त्यांच्या वागण्यात सुद्धा उतरलेली आहे कारण असं म्हटलं जातं तेव्हा आपण बोलतो त्याच्या अगोदर त्याचे सिम्बॉल्स आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतात आणि ते नकळतपणे आपल्या स्वभावामध्ये झिरपत असतात आणि कुठे ना कुठे आजकाल वाढलेली भांडण ,मुलांना पटकन येणारा राग , उद्भवणाऱ्या मारामाऱ्या ,आजकालच्या तरुण पिढींना लवकर येणारी निराशा डिप्रेशन इत्यादी गोष्टी जास्त प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसून येतात .पण हे मुलांपर्यंत पोहोचत कुठून असेल ? तर यासाठी सुद्धा तुम्ही मी आपण सर्वच जबाबदार आहोत मास मीडिया मुख्यत्वे करून इलेक्ट्रॉनिक मीडिया जसा मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर व्हायला लागला टीव्ही वरती वेगवेगळ्या चैनल आणि त्यातून ओटीपी प्लॅटफॉर्म यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या वेब सिरीज चे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामध्ये होत असलेला बोली भाषेचा वापर आणि मुख्यत्व करून त्यामध्ये यांचा आर्वांच भाषेचा , शिव्याचा व लैंगिक कृत्यांचा वापर करून ती वेब सिरीज पॉप्युलर करण्याबाबत साठी आणखी मसाला टाकून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीत लवकर आणि जास्त पसरतात ही पूर्वपारपासून चालत आलेली वृत्तीचा वापर हे प्रसार माध्यमे करतात आणि काही पैशांसाठी अशा गोष्टी समाजामध्ये पसरवतात पण हे करत असताना आपण आपल्या समाजाचे आपल्या देशाचे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहोत त्यांचा लवलेशी त्यांना नसतो . मग आता आपण कितीही ओरडलं तरी याचं प्रमाण कमी होणार आहे का ? तर बिलकुल नाही मग काय करावे तर मग आता पुन्हा जबाबदारी येते ती आई-वडील , पालक आणि समाजांमधील जागरूक नागरिकांची. शाळेमध्ये मुलांना शिकवत असताना शिक्षकांनी भाषेचा सुंदर उपयोग करून आपलं म्हणणं प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवता कस येतं हे कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे घरामध्ये सुद्धा आई-वडिलांनी टीव्हीवर किंवा मोबाईलवर आपण काय पाहतो व आपण पाहत असताना आपली मुलं ते नकळतपणे ग्रहण करतात याची जाण ठेवून मुलांच्या पुढे उत्तम उदाहरण आपल्याला कसं ठेवता येईल किंवा जर आई-वडीलच घरांमध्ये वाचत बसले तर मुलं सुद्धा आज ना उद्या वाचायला सुरुवात करते अशा काही गोष्टी तर घरामध्ये आपण अंगीकारल्या आपण काय बोलतोय याचा कळत नकळतपणे मुलांवरती प्रभाव होत असतो त्यामुळेत्यामुळे आपली भाषा व आपण जे काही वागतोय हे मुलांच्या समोर आदर्शवत होईल व त्यातून मुलांवरती कळत नकळतपणे चांगले संस्कार घडतील व उद्देश समोर ठेवून घरातील मोठ्यांचं आचरण असले पाहिजे व त्याचबरोबर समाजातील जाणकार व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या समाजातील भाषा किती कशी चांगले आहे त्याचा प्रभावी वापर कसा करायचा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विविध व्याख्यानमालांच्या स्वरूपात जे आजच्या पिढीला आवडेल अशा प्रकारे जर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर त्यांना निश्चितच आवडेल. मागे एम टीव्ही वरती रॅप म्युझिकच्या कॉम्पिटिशन मध्ये एका अमरावतीच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक रॅप सॉंग प्रेझेंट केलं आणि अल्पावधीतच ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवलं पण त्या रॅप सॉंग मध्ये वापरण्यात येणारी भाषा त्यामध्ये विशेषणे खूप उत्तम दर्जाची होती. अशाच प्रकारच्या गोष्टी जर आपण तरुण पिढी पर्यंत पोहोचवत गेलो तर पिढीची भाषा एक व एकंदरीत समाजाची भाषा त्यांची वर्तवणूक मध्ये नक्कीच सुधारणा घडवून येईल.
शब्दांकन प्रा. महेश खडके
मंगळवार ,दिनांक 9 जानेवारी 2024 वेळ सकाळी 3:45
ठिकाण कल्याण दादर लोकल


बेहतरीन लेख
ReplyDelete